कधी इतकं प्रेम झालं....
काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलंस....
काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस
हे खरंच नाही आठवत,
पण आठवण काढल्याशिवाय
आता खरंच नाही राहवत.
रोजच उठायचं एक नवा सूर्य पाहायला, खोटं हासु चेहे-यावर ठेवून, दुस-यांच दुख: प्यायला.. रोजच येते सांज मोकळ्या हातानी, उदया परत येईन, सांगुन गेलायं, तोच सूर्य जातानी.