Sunday, November 22, 2015

कधी झालं..


कधी इतकं प्रेम झालं....
काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलंस....
काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस
हे खरंच नाही आठवत,
पण आठवण काढल्याशिवाय
आता खरंच नाही राहवत.

Wednesday, November 11, 2015

स्वप्नातली ती..



स्वप्नातली ती आता सत्यात उतरली,
अन् तिच्या येण्याने माझी दुनिया बदलली..
जिच्या शोधात मी फिरलो इथे तिथे,
ती तर मला जवळचं सापडली..

आमच्याही प्रेमाची गाडी आता चालू झाली आहे,
गाडीवर मागे बसायला पोरगी मिळाली आहे..

About Me

I am ambitious, calm and have lots of patience..